मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत च्या ट्विटर अकाउंटवर वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटमुळे कायमची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी होते, ज्यांना कंगनाने खूप टार्गेट केले होते. सोमवारी जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ झाले. कंगनाने जॅक डोर्सी गेल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.

कंगना रणौतने शेतकरी आंदोलन आणि बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर अनेक वादग्रस्त व्हिडिओ आणि ट्वीट तिच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले होते. यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाउंट कायमचं बंद केलं होतं. याचं कारण देताना ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की कंगना ट्विटरच्या नियमांविरूद्ध आणि द्वेष पसरवणारे ट्वीट करत आली होती. ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्याने कंगना प्रचंड संतापली होती.