हायलाइट्स:
- नव्या विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने सरकारकडून सावधगिरी
- पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय बदल्यानंतर अजित पवार यांचं स्पष्टीकरण
- सरकारच्या बैठकीबाबतही दिली माहिती
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
‘पुण्यात शुक्रवारी नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यावेळी नव्या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक असल्याचं जाणवलं नव्हतं. मात्र पुढील दोन दिवसांत मुंबई विमानतळावर एक हजार प्रवासी उतरले. त्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू केलं आहे. ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सरकारची बैठक झाली. त्या बैठकीत या संसर्गाबाबतच्या धोक्यावर चर्चा झाली. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. याच परिस्थितीमुळे शुक्रवारी पुण्यासाठी घेतलेला निर्णय बदलावा लागला,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, ‘आफ्रिकेतून आलेल्या रुग्णाला क्वारंटाइन ठेवण्याच्या सूचना संबंधित शहरांच्या महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसंच पुण्यात घेतलेल्या निर्णयाऐवजी राज्य सरकारच्या वतीने जे निर्णय जाहीर होतील त्याची पुण्यात अंमलबजावणी करण्यात यावी,’ अशा सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.