हायलाइट्स:

  • वारांगना संघटनांच्या समर्थकांत आज तुफान हाणामारी
  • शाहूपुरी पोलीस ठाण्यात आमने-सामने
  • दोन्ही संघटनांकडून एकमेकांविरोधात तक्रार

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वारांगनांना कोव्हिड काळातील नुकसानीची भरपाई (लॉकडाऊनमध्ये सेक्स वर्कर्स) देण्याचं काम सुरू आहे. मात्र कोल्हापूर शहरातील वारांगना सखी संघटना आणि संग्राम संघटनेच्या समर्थकांत आज तुफान हाणामारी झाली. व्हिनस कॉर्नर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही गटातील समर्थक शाहूपुरी पोलीस ठाण्यात आमने-सामने आले. तिथंही वातावरण तणावपूर्ण झालं होतं. दोन्ही संघटनांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होते.

सुप्रीम कोर्टाने कोव्हिड काळात देशभरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना नुकसान भरपाई म्हणून महिना ५ हजार रुपये देण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारने वारांगणांसाठी रक्कमेची तरतूद केली आहे.

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अखेर बड्या अधिकाऱ्यांचा पाय खोलात; गुन्हा दाखल

कोल्हापुरात संपदा ग्रामीण महिला संस्था म्हणजेच संग्रामच्या माध्यमातून वारांगनांना नुकसान भरपाई पोटी तीन महिन्याचे प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचे काम सुरू आहे. यातूनच वादाला ठिणगी पडली. वारांगना सखी संघटनेच्या एका महिलेने नुकसानभरपाईसाठी संग्राम संस्थेकडे अर्ज केला होता. त्यामुळे सखी संघटनेच्या सदस्यांनी तिला लक्ष्मीपुरी परिसरात वेश्या व्यवसाय करण्यास मज्जाव केला. त्यातूनच आज सायंकाळी चार वाजता संग्राम आणि सखी संघटनेच्या सदस्यात वादावादी आणि त्यानंतर हाणामारीची घटना घडली.

Vidarbha State Proposal: स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत मोठी बातमी; मोदी सरकारने घेतली ‘ही’ भूमिका

पुन्हा वाद वाढल्याने वारांगना सखी संघटना आणि संग्राम संघटनेचे सदस्य एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा झाले. दोन्ही संघटनेचे सदस्य समोरासमोर आल्याने पुन्हा वाद वाढला. त्यातून मध्यस्थी करण्याचा झालेला प्रयत्न फोल ठरला. अखेर एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी दोन्ही संघटनांतील सदस्य रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाणे परिसरात थांबले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here