सांगली : मुंबई जिल्हा बँकेचा कोणताही पैसा स्वतःसाठी वापरलेला नाही. बँकेची बदनामी केल्यास बँकेच्या ठेवीदारांवर, व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी जपून बोलावं, असा सल्ला देत मंत्री नवाब मलिक यांच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं प्रत्युत्तर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. (मुंबई बँक फसवणूक प्रकरणाची बातमी)

प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सत्ताबदल होणार असल्याचं भाकीतही पुन्हा एकदा केलं आहे.

‘महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्ट्र २५ वर्षे मागे गेला आहे. राज्यात सत्ताबदल होणार या हवेतील गप्पा नाहीत. हा बदल १०० टक्के होणार आहे. भाजप विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही कुणाला सोबत घेऊ, हे आत्ताच सांगणार नाही. वेळ आल्यावर सारे घडेल,’ असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. तसंच महापूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविकास आघाडी सरकारने केवळ पाने पुसली आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळत नाही. सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे, असा घणाघातही दरेकर यांनी केला.

Omicron Variant ओमिक्रॉनचा धोका: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; २ आठवड्यांनंतर…

नवाब मलिकनवार यांनी पलटवार केला

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बँकेच्या कारभारावरून प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली होती. त्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढावा. त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

Omicron Variant: महाराष्ट्रावर घोंगावतंय ओमिक्रॉनचं संकट; आफ्रिकेतून आलेले ‘ते’ सहा प्रवासी…

‘महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सर्वच क्षेत्रात वसुली सुरू आहे. राज्य सरकारच्या आरोग्य सेवक भरतीवेळी भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काळ्या यादीतील कंपन्यांकडून भरती प्रक्रिया राबवली आहे. पेपर फुटत असल्याकडे लक्ष वेधलं होतं. त्यावेळी आम्हाला राजकीय दृष्टीकोनातून पाहिले. मात्र आता भरतीतील भ्रष्टाचार पुढे येत आहे,’ असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here