औरंगाबाद : लसीकरण सुरू असतानाच ०१ डिसेंबर नंतर राज्यात लसीकरण बंद केले जाणार असल्याची अफवा गावात पसरल्याने गावकऱ्यांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर तुंबळ गर्दी केली. त्यामुळे पोलिसांना बोलवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथील ही घटना आहे.

त्याचं झालं असं की, साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या फरदापुर ग्रामपंचायत मध्ये लसीकरण सुरू होतं. याच वेळी कुणीतरी ०१ डिसेंबरनंतर लसीकरण बंद होणार असल्याची अफवा गावात पसरवली. मग काय पहाता-पहाता शेकडो लोकांची गर्दी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जमा झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांना बोलवावं लागलं. घटनेची माहिती मिळताच फरदापूर पोलीस तात्काळ दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Weather Alert : मुंबई, पुण्यात पावसाला सुरुवात; राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मात्र, गर्दी मोठी असल्याने आणि लसीकरण केंद्रात फक्त पाच कर्मचारी असल्याने लसीकरण संत गतीने सुरू होते.त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी आणखी २० कर्मचाऱ्यांना बोलवून लसीकरण सुरू केलं. विशेष म्हणजे हे लसीकरण रात्री ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत सुरू होते.तर पहिल्यांदाच एका दिवसात गावातील ४१० लोकांचं लसीकरण करण्यात आले. त्यामुळे उपस्थित लोकांचं लसीकरण संपल्यानंतर आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

धक्कादायक! काळाचौकीत सव्वा तीन महिन्यांच्या बालिकेचं अपहरण, परिसरात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here