Satara Accident News: साताऱ्यातील दहिवडी येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

स्विफ्ट कारचा अपघात

स्विफ्ट कार अपघात

हायलाइट्स:

  • साताऱ्यातील दहिवडी येथे कार-ट्रकची समोरासमोर धडक
  • अपघातात दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी
  • स्विफ्ट कारचा झाला चक्काचूर, ट्रकही उलटला

सातारा: दहिवडी येथे मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्विफ्ट कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही मृत दहिवडी गावातीलच आहेत. (Car-Truck collision at Dahiwadi in सातारा)

दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय २२), स्वयंम सुशील खरात (वय १६) आणि अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटणहून दहिवडीला येत होते. त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता. दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला, तर कारला धडकलेला ट्रक उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात पियुष आणि स्वयंम हे दोघे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

अपघात

हेही वाचा:

कॅडबरी चॉकलेट घेऊन चंद्रकांत पाटील पोहोचले राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या घरी

‘सर्व काही मोबाइलमध्ये’ असं स्टेटस ठेवून केली आत्महत्या; प्रत्यक्षात घडलं वेगळंच!

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: सातारा : दहिवडी येथे स्विफ्ट कार आणि ट्रकची धडक, 2 ठार, 1 जखमी
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here