हायलाइट्स:

  • शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला
  • लहानग्याने केला प्रतिकार
  • जखमी मुलावर उपचार सुरू

जळगाव : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला (बिबट्याचा हल्ला) चढवल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील पालच्या वनक्षेत्रात घडली. दीपला माल्या बारेला (रा.मांजल, मध्य प्रदेश) असं हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

हल्ला करणार्‍या बिबट्यासोबत दीपला यानेही जोरदार झुंज दिली. हल्ल्यात दीपला यास तोंड, मान व डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्याच्यावर जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगलीत राजकीय तणाव; पोलिसांनी ६ नगरसेवकांना घेतलं ताब्यात

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपल्या बारेला हा आज गावापासून काही अंतरावरच पालच्या मोंढेच्या वनक्षेत्रात मित्रासोबत शेळ्या चारण्यासाठी गेला होता. शेळ्या चारताना अचानकपणे बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढवला, त्यानंतर दीपला याच्यावरही हल्ला केला. दीपलाने प्रतिकार केल्याने त्याचा जीव वाचला आहे. यादरम्यान सोबतची मुले घटनास्थळावरुन गावात पोहचली आणि घटनेची माहिती गावकर्‍यांना सांगितली.

कॉलेज तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात: २ जणांचा जागीच मृत्यू; दोघांवर उपचार सुरू

दीपलाचे वडील माल्या बारेला व गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत दीपला याला गंभीर जखमी करून बिबट्या पसार झाला होता. जखमी दीपला याला दुचाकीवर तात्काळ पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला दुपारी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here