औरंगाबाद : ओमायक्रॉन या नवीन करोना विषाणुमुळे डिसेंबर ते मार्चदरम्यान होणारी संभाव्य रुग्ण संख्या व लागणारी औषधी यासाठी महापालिकेने तीस कोटींची मागणी सरकारकडे केली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

करोनाचा ओमायक्रॉन विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यासाठी व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रशासकांची बैठक घेतली. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर महापालिकेने तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

Weather Alert : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
डिसेंबर ते मार्चदरम्यान अपेक्षित असलेली रुग्ण संख्या, औषधी, अन्नपुरवठा, उपचारासाठीचे पुरक साहित्य व उपकरणे, अँटिजेन चाचण्यांचे किट, आरटीपीसीआर चाचण्यांचे किट,कं त्राटी मनुष्यबळ, रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा पुरवठा, मोफत अंत्यविधी, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आदींसाठी तीस कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला आहे असा उल्लेख त्यांनी केला. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही तरतूद करण्यात यावी अशी विनंती करण्यात आल्याचे पांडेय म्हणाले.

Covishield Booster Dose मोठी बातमी: ओमिक्रॉनला रोखणार कोव्हिशील्डचा बूस्टर डोस?; सीरमने उचलले पुढचे पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here