नवी दिल्ली : महिला टेनिस असोसिएशनने () आणि हाँगकाँगमध्ये होणाऱ्या सर्व टेनिस स्पर्धा स्थगित केल्या आहेत. चीनची महिला टेनिसपटू पेंग शुआईच्या सुरक्षेबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे, असे डब्ल्यूटीए टूरचे अध्यक्ष स्टीव्ह सायमन यांनी सांगितले.

वाचा-

यावर्षी चीनमध्ये ११ स्पर्धा आयोजित करण्याची योजना होती. काही स्पर्धा कोरोनामुळे रद्द कराव्या लागल्या. सायमन यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, ‘मी चीन आणि हाँगकाँगमधील सर्व डब्ल्यूटीए (WTA) स्पर्धा तत्काळ निलंबित करण्याची घोषणा करतो. पेंग शुआईला खुलेपणाने बोलण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आमचे खेळाडू तिथे मुक्तपणे खेळू शकतील, असे मला वाटत नाही.

वाचा-

३५ वर्षीय पेंग शुआईने विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. प्रसिद्ध टेनिसपटू सध्या कुठे आहे? याबाबत अद्याप कोणालाच माहिती नाही.

लैंगिक शोषणाचे आरोप
चीनच्या माजी उप-प्रधानमंत्री झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. शुआईने २ नोव्हेंबर रोजी एका विबो (Weibo) पोस्टमध्ये दावा केला होता की, गाओली यांनी तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली होती. अर्ध्या तासानंतर तिची ही पोस्टही डिलीट करण्यात आली. काही दिवसांनी ती एका टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला कोणीही सार्वजनिक ठिकाणी पाहिले नाही किंवा कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

वाचा-

पेंग ही महिला दुहेरीत जगातील अव्वल खेळाडू आहे. तिने २०१३ मध्ये विम्बल्डन आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपन जिंकली होती. पुढील वर्षी ४ फेब्रुवारीपासून बीजिंगमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी स्पर्धांपूर्वी तिचे गायब होणे, हे एक मोठे प्रकरण बनले आहे. २ नोव्हेंबर रोजी पेंगने एका लांबलचक पोस्टमध्ये लिहिले होते की, तीन वर्षांपूर्वी वारंवार नकार देऊनही झांग गाओलीने तिला सेक्स करण्यास भाग पाडले होते. विबोवरील पेंगच्या अकाउंटवरून ती पोस्ट काही वेळातच गायब झाली, पण तोपर्यंत त्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here