बीजिंग, चीन:
स्पर्मपासून प्लास्टिक… वाचायला आणि ऐकायला जरा जड जातंय का? पण हा प्रयोग सत्यात आणलाय चीनच्या काही वैज्ञानिकांनी… चीनच्या शास्त्रज्ञांनी ‘सॅल्मन’ माशांच्या स्पर्म्सपासून पर्यावरणपूरक अर्थात बनवण्यात यश मिळवलंय.

सॅल्मन माशाच्या स्पर्ममधील डीएनएमध्ये खाद्यतेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनात मिसळून हे प्लास्टिक तयार करण्यात आलंय. दोन्ही पदार्थांच्या मिश्रणातून तयार झालेल्या पदार्थाला ‘हायड्रोजेल’ नाव देण्यात आलंय. हे वेगवेगळ्या आकारात टाकलं गेलं. तसंच त्यातला ओलावा काढून टाकण्यासाठी त्याला वाळवण्यात आलं.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर हा पदार्थ टणक बनला. या पर्यावरणपूरक प्लास्टिकपासून संशोधकांनी एक कप आणि इतर अनेक वस्तू बनवल्या आहेत.

चिनी शास्त्रज्ञांनी पर्यावरणपूरक प्लास्टिकसाठी सॅल्मन माशाच्या शुक्राणूपासून तयार केला असला तरी डीएनएमध्ये पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रत्येक जीवाचा जनुकीय कोड आढळून येतो. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात पृथ्वीवर ५० अब्ज टन डीएनए असल्याचं समोर आलं होतं.

प्लास्टिक ठरतंय पर्यावरणासाठी मोठं संकट

याचाच अर्थ, आपण आता तांत्रिकदृष्ट्या पिकांचे अवशेष, एकपेशीय वनस्पती किंवा जीवाणू यांसारख्या टिकाऊ स्त्रोतांपासून प्लास्टिक बनवू शकतो. जगभरात ‘पेट्रोकेमिकल्स’पासून बनवलेलं प्लास्टिक पर्यावरणासाठी मोठं संकट ठरतंय. हे प्लास्टिक बनवण्यासाठी भरपूर उष्णतेची आवश्यकता असते. त्यापासून विषारी पदार्थही तयार होतात. तसंच प्लास्टिक तयार झाल्यानंतर त्याचं विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागू शकतात. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि रिसायकल करता येण्याजोग्या प्लास्टिकची गरज निर्माण झालीय.

‘हायड्रोजेल’ प्लास्टिकची वैशिष्ट्यं

‘टियांजिन युनिव्हर्सिटी’चे डेओंग यांग आणि त्यांच्या टीमनं या सगळ्या समस्या दूर करण्याचा चंगच बांधलाय. डीएनए – आधारित प्लास्टिक सध्याच्या प्लास्टिकपेक्षा ९७ टक्के कमी कार्बन उत्सर्जित करतं. एवढंच नाही तर ते रिसायकल करणंही खूप सोपं आहे. हे प्लास्टिक ‘एन्झाईम’च्या मदतीनं नष्टही करता येणं शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here