हायलाइट्स:

  • पोलिसांकडून कठोर कारवाई
  • गुन्हेगारी टोळीविरोधात मोक्का
  • गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उचललं पाऊल

पुणे : पुणे शहर आणि परिसरात मागील काही काळापासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. शहरात विविध गुन्हेगारी टोळ्या धुडगूस घालत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई (पुणे पोलीस कारवाईत) करण्यात येत आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार मंगेश माने आणि त्याच्या पाच साथीदारांवर आता मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

मंगेश माने आणि त्याच्या टोळीतील साथीदारांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात १० गुन्हे दाखल आहेत. कोंढवा बिबेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची दहशत होती. लोकांना दमदाटी करून गंभीर गुन्हे त्यांनी केले आहेत. वारंवार प्रतिबंध करूनही त्यांनी हे गुन्हे केल्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Param Bir Singh Suspended: मोठा धक्का! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर निलंबित; सूत्रांची माहिती

मंगेश अनिल माने (वय २६, बिबवेवाडी), लाडाप्पा ऊर्फ अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी (वय २० ,कोंढवा बुद्रुक), सुरज अंकुष बोकडे (वय २२, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हंनाळनंदे (कोंढवा) आणि प्रतीक रमेश हनाळनंदे (कोंढावा) अशी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

कोंढवा, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी परिसरात त्यांची दहशत होती. लोकांना दमदाटी करणे, विना परवाना हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे अशा विविध प्रकारचे गुन्हे त्यांनी केले आहेत.

tatkare vs jadhav: तटकरे माझ्या अंगावर कधी येतात हेच पाहत होतो; भास्कर जाधव यांचे आव्हान

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ते कारवाईस धजावत नव्हते. तसंच त्यांच्या वर्तनात ही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ मोक्का कारवाया करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here