मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. कतरिना आणि विकीनं याला दुजोरा दिला नसला तरी लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या ९ तारखेला राजस्थानमधील एका राजवाड्यात दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांका-निक जोनास, दीपिका आणि रणवीर , अनुष्का – विराट यांनी जशी लग्नासंर्भात गुप्तता पाळली होती. तसंच काही विकी आणि कतरिना यांनी ठरवल्याचं चित्र आहे.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची अटींची यादीच बनवण्यात आली असून हे नियम पाहुण्यांना पाळायचे आहेत. कुटुंबिय आणि जवळची मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार असला तरी सुरक्षेची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयातून पाच अधिकारी येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळं सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येत आहेत.
सलमानच्या कुटुंबियांनाच नाही कतरिना- विकीच्या लग्नाचं आमंत्रण, अर्पितानेच केला खुलासा
कुठे आहे लग्न?
विकी आणि कतरिना यांचं लग्न राजस्थानमधील सवाई माधवपूर जिल्ह्यामधील एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. या हॉटेलचं नाव सिक्स सेंसेज फोर्ड हॉटेल आहे. हे संपूर्ण हॉटेल एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे. त्यामुळे लग्न एका हॉटेलमध्ये नसून एखाद्या महालात करत असल्याप्रमाणे भासणार आहे,. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे हॉटेल ७ ते १२ डिसेंबर या तारखांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. हॉटेलच्या वेबसाइटनुसार, हॉटेलमधील सगळ्यात महागडा हिस्सा ‘राजा मान सिंह सूट’ आहे. या एका सूटचा एका रात्रीचा खर्च तब्बल ९० हजार रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here