हायलाइट्स:

  • ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंता
  • मात्र करोनाबाबत अहमदनगर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी
  • उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच पाचशेच्या खाली

अहमदनगर : करोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (ओमिक्रॉन Variant) हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाचपट अधिक घातक असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळल्याने आपल्या देशातही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या (अहमदनगर कोरोना अपडेट) शंभरच्या आत आली असून गुरूवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच पाचशेच्या खाली नोंदवली गेली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही चिंताजनक स्थिती असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ९१ जणांना डिस्चार्ज मिळाला, तर नव्या ६८ रुग्णांची नोंद झाली. सध्या ४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी सक्रीय रुग्णांची संख्या आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्के झालं आहे.

Omicron In India: ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्राकडून मिळाले ‘हे’ उत्तर

श्रीरामपूर १३ आणि श्रीगोंदा १० रुग्ण वगळता बाकी सर्व तालुक्यांत दैनंदिन रुग्णसंख्या एक अंकी आहे. अकोले, जामखेड, पाथर्डी या तालुक्यांत आणि भिंगार शहरात आज एकही रुग्ण आढळून आला नाही. संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांची स्थिती आधी अतिशय गंभीर होती. केवळ जिल्हाच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यांतही यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. आज पारनेरमध्ये ३ तर संगमनेरमध्ये २ रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेनंतर प्रथमची ही दिलासादायक परिस्थिती समोर आली आहे.

omicron india : ‘ओमिक्रॉन’ भारतात… आता पुढील दोन आठवडे महत्त्वाचे… काय म्हणाले तज्ज्ञ डॉक्टर? वाचा…

दरम्यान, असं असलं तरी नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं आहे. राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध नगर जिल्ह्यातही लागू करण्यात आले आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा मात्र १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोविड सेंटर आणि अन्य आरोग्य सुविधांचा आढावा घेतला आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने सध्या कोविड सेंटर बंदच आहेत, मात्र गरज पडल्यास ती तातडीने सुरू करता येतील अशी सज्जता ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here