हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
  • कुणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ?
  • शुक्रवारी होणाऱ्या निवडीआधी उत्सुकता शिगेला

जळगाव : जिल्हा बँकेत शुक्रवारी चेअरमनपदाची (जिल्हा बँकेचे अध्यक्ष) निवड होणार असल्याने महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक आज जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत चेअरमनपद आणि व्हाइस चेअरमनपदाबाबत फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

जिल्हा बँकेत सर्वात अगोदर चेअरमनपदाची संधी राष्ट्रवादीला मिळणार असून तीन वर्षांसाठी हे पद त्यांच्याकडे राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्ष शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असून व्हाइस चेअरमनपदासाठी पहिली दोन वर्ष कॉंग्रेस, त्यानंतरची दोन वर्ष शिवसेना तर अखेरच्या वर्षी राष्ट्रवादीला संधी मिळणार आहे. हा फार्म्युला निश्‍चित झाला असला तरी अद्यापही चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदाचे उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

Omicron In India धक्कादायक: डॉक्टरला ओमिक्रॉनची लागण; ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, संपर्कातील ५ जण…

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ तर कॉंग्रेसचे ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.

मंत्र्यांच्या गावात तणाव: पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट; गाड्यांच्या काचा फोडल्या!

दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तर कॉंग्रेसकडून आ. शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते. सुमारे दीड तास ही कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादीला चेअरमनपदाची पहिल्यांदा संधी देण्यात आली असून तीन वर्षांसाठी त्यांचा उमेदवार चेअरमनपदी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर माजी मंत्री एकनाथ खडसेंना दिले होते.

दरम्यान, पक्षश्रेष्ठी चेअरमनपदासाठी ज्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करतील त्या व्यक्तीला संधी मिळणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी होणाऱ्या निवडीपूर्वी चेअरमन व व्हाइस चेअरमनपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून नाव जाहीर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here