डायरेक्टर म्हणाले की, कनिकाला इस्पितळातील ग्लूटेन फ्री जेवण दिलं जात आहे. एवढंच नाही तर सर्वसामांन्यांना ज्या सुविधा दिल्या जात नाहीत त्या तिला दिल्या जात आहेत. कनिकाला ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत त्यात आयसोलेटेड खोली, त्यात एक टॉयलेट, बेड आणि टीव्ही आहे. कोविड १९ युनिटनुसार तिच्या रूमला एअर हँडलिंग युनिटही आहे. हे युनिट इतर करोना व्हायरस युनिटहून वेगळं आहे. असं सर्व असतानाही ती इस्पितळात एखाद्या रुग्णाप्रमाणे नाही तर सेलिब्रिटीप्रमाणे वागत आहे.
दरम्यान, कनिकाने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटलं की, ‘मला आता ताप आहे. मी इस्पितळात आहे. एकटी आहे. इथे खायला आणि प्यायला काहीही मिळत नाहीये. मी फार तणावात आहे. मला नाही माहीत माझी कशी चाचणी होत आहे. याउलट डॉक्टर मला धमकावत आहेत. ते मला म्हणाले की, मी फार मोठी चूक केली. मला नाही माहीत या सर्व गोष्टी कुठून आल्या.’
‘इस्पितळात माझी मदत करण्याऐवजी मला धमकावलं जात आहे. मी क्वारनटीनमध्ये आहे. अशावेळी रुग्णाला धमकावलं जाऊ नये. कोणाला काहीही बोलणार का? या सगळ्या अफवा आहेत. भारतात विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांपासून मी कशी पळू शकते. मी शिक्षित आहे. मी फार मेहनत घेते आणि मला माहीत नाही या सर्व गोष्टी कोण पसरवत आहे.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times