हायलाइट्स:

  • मुंबईतील काळाचौकी येथील धक्कादायक घटना
  • जन्मदात्रीनेच केली तीन महिन्यांच्या मुलीची हत्या
  • दुसरीही मुलगी झाल्याने मातेचे धक्कादायक कृत्य
  • हत्येनंतर रचला मुलीच्या अपहरणाचा बनाव

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काळाचौकी येथून दोन दिवसांपूर्वी घरातून कथित अपहरण झालेल्या साडेतीन महिन्यांच्या मुलीची जन्मदात्या आईनेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. सपना मकदूम (वय २९) असे या निर्दयी आईचे नाव आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने कुटुंबीयांकडून मानसिक छळ केला जात असल्याने हे कृत्य केल्याचे तिने सांगितले. आपल्यावर संशय येऊ नये आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सपना हिने मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिचे हे कृत्य उघडकीस आणले आहे.

काळाचौकीच्या फेरबंदर परिसरातील संघर्ष सदन या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सपना मकदूम ही पती आणि कटुबीयांसोबत वास्तव्यास आहे. ३० नोव्हेंबरला घरात एकटीच असताना, जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी विकणारी महिला आली होती. तिने नाकाला गुंगी येणारे औषध लावून बेशुद्ध केले आणि विछ्यान्यावरील लहान मुलीला पळवून घेऊन गेली, अशी तक्रार सपनाने काळाचौकी पोलिस ठाण्यात केली होती. लहान मुलीला घरातून पळविण्यात आल्याने काळाचौकी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने काळाचौकी-लालबाग परिसरात खळबळ उडाली. पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेची पथके कामाला लागली. सपनाने दिलेल्या वर्णनावरून, तसेच सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित चेहऱ्यावरून पोलिसांनी महिलेचे रेखाचित्र जारी केले होते.

माझ्या जीवाला धोका आहे… पुण्यातील तरुणीचा पोलीस आयुक्तांना मेसेज; शोध घेतला तेव्हा कळले की…
गुंतवणुकीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक

चार दिवसांनंतर काहीच धागादोरा हाती लागत नसल्याने घटनाक्रम जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ३च्या कार्यालयात सपनाला बोलविण्यात आले. प्रभारी पोलिस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रकाश लिंगे, उपनिरीक्षक सिद्धेश जोष्टे यांच्यासह पोलिसांचे पथक तिच्याकडून माहिती जाणून घेत होते. माहिती घेत असतानाच पोलिसांनी तिच्या घरातील इतर सदस्यांबाबतही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घरच्यांचा त्रास असल्याचे सांगतानाच सपना हिने मुलीला आपणच मारल्याचे कबूल केले. पोलिसांनी घरातील पाण्याच्या टाकीतून साडेतीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह हस्तगत केला.

kiran gosavi फसवणूक प्रकरण: साक्षीदार किरण गोसावी याच्यावर पोलिसांची मोठी कारवाई
Thane : मराठी अभिनेत्याच्या बायकोचे धक्कादायक कृत्य; ज्येष्ठ नागरिकाला…

मुलासाठी दोनदा गर्भपात

सपना हिला आठ वर्षांची एक मुलगी आहे. या मुलीच्या जन्मापासून पतीबरोबरच घरातील इतरही सदस्य तिला मुलगा झाला नाही म्हणून त्रास देऊ लागले. या मुलीनंतर दोन वेळा सपना गर्भवती राहिली. मात्र, हावभाव आणि वागणुकीवरून तिच्या पोटातील गर्भ हा मुलीच असल्याचे समजून घरच्यांनी तिला गर्भपात करायला लावले. यावेळेस मुलगा होईल हा त्यांचा अंदाज चुकला आणि मुलगी झाल्याने कुटुंबाने सपनाचा अधिकच मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच माझ्या हातून हे कृत्य घडल्याचे तिने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here