हायलाइट्स:

  • मुंबई, पुण्यासह राज्याचे टेन्शन वाढले
  • महाराष्ट्रात ओमिक्रॉन संशयितांचा आकडा २८ वर
  • मुंबईत १० संशयित, उर्वरित विविध शहरांतील असल्याची माहिती
  • संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले

मुंबई: देशात ओमिक्रॉनचे (Omicron) दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यात महाराष्ट्रात एकूण २८ ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्यानं ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील १० संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत. (महाराष्ट्रातील ओमिक्रॉन नवीनतम अपडेट)

करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रकाराने जगामध्ये दहशत माजवली आहे. भारतात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आणि या विषाणूने अखेर देशात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा, सरकार सतर्क झाले असून, उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडल्याने राज्याची डोकेदुखी वाढली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेकडो जण परदेशातून आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे २८ संशयित सापडले आहेत. त्यातील १० जण हे मुंबईतील आहेत. तर इतर उर्वरित शहरांतील आहेत. या २८ जणांपैकी २५ जण हे विदेशातून आलेले आहेत. तर इतर ३ जण हे त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती समजते.

Omicron च्या संकटात भारताची ‘ही’ लस ठरणार जगासाठी ‘संजीवनी’?
omicron suspect in india : आफ्रिकेतून आलेले ४ जण ‘ओमिक्रॉन संशयित’, आता ‘या’ राज्याची चिंता वाढली

राज्यात ओमिक्रॉनचे २९ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १० जण हे मुंबईतील आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचण्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. मुंबईत अद्याप एकही ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल लवकरच येतील अशी शक्यताही व्यक्त केली.

हे सर्व जण गेल्या महिनाभराच्या कालावधीत विदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यातील २५ जण हे विदेशातून महाराष्ट्रातील विविध भागांत परतले असून, उर्वरित तीन जण हे या लोकांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. या सर्व रुग्णांचे करोना चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

Omicron Update : डोंबिवलीच्या ‘त्या’ तरूणासोबत विमान प्रवास करणाऱ्याचा करोना रिपोर्ट आला

मुंबईत काय आहे परिस्थिती?

गेल्या महिनाभराचा आढावा घेतला तर, मुंबईत विदेशातून परतलेल्यांची संख्या अडीच हजारांहून अधिक असल्याची माहिती आहे. हे सर्व प्रवासी हाय रिस्क देशांतून आलेले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अशा सर्व लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. यातील ८६१ जणांचा शोध लागला असून, त्यातील २५ जण हे करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर या २५ जणांपैकी काहींच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, या तीन जणांनी विदेशात प्रवास केलेला नाही.

Omicron Variant : महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉनची धडक; ‘या’ जिल्ह्याने उचललं कठोर पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here