हायलाइट्स:

  • ‘ससुराल गेंदा फूल २’ प्रेक्षकांच्या भेटीला
  • सुप्रिया पिळगावकर छोट्या पडद्यावर
  • शेअर केला अनुभव

चांगले सासरचे घर‘ – एक दिलखुलास कुटुंब
या मालिकेचा पहिला सीझन दहा वर्षांपूर्वी आम्ही केला होता. आता पुन्हा दुसरा सीझन करणं ही एक पर्वणी आहे. मालिकेत खूप अवलिया कलाकार मंडळी आहेत आणि सगळ्यांचं एकमेकांशी छान बाँडिंग आहे. त्यामुळे आमची मालिकेतील कौटुंबिक दृश्यही खूप खुसखुशीत होतात. मी शैलजा कश्यप ही भूमिका साकारत आहे. शैलजा ही कश्यप कुटुंबातली मोठी सून आहे. एकत्र कुटुंबात सर्वांना सांभाळणं, सामावून घेणं ही तिची जबाबदारी ती प्रेमानं पार पाडताना दिसणार आहे.

हवाहवासा लंच ब्रेक
‘ससुराल गेंदा फूल’च्या सेटवरचा लंच ब्रेक म्हणजे दररोजची ठरलेली जंगी पार्टी असते. प्रत्येक जण सबंध युनिटला पुरेल असा चविष्ट डबा आणतो. वेगवेगळ्या चवीच्या रुचकर पदार्थांचा आस्वाद घेत, एकमेकांची थट्टामस्करी करत आम्ही लंचब्रेकमध्ये खूप धम्माल करतो. याशिवाय सीन्सच्या अधूनमधून आळीपाळीनं एक-एक जण सुक्या खाऊचे डबे उघडत असतो.

वेब सीरीज हे आव्हानात्मक माध्यम…
कथानकाला न्याय देणारी वेब सीरिज तयार करणं हे खऱ्या अर्थानं आव्हानात्मक आहे, असं मला वाटतं. एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या धाटणीच्या अनेक व्यक्तिरेखा साकारण्याचा आनंद या माध्यमात घेता येतो. वेब सीरिज या माध्यमानं मनोरंजनसृष्टीत आमूलाग्र बदल घडवून स्वतःचं असं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सचिन-सुप्रिया पुन्हा एकत्र?
आम्ही दोघांनी खूप वर्षांत एकत्र काम केलं नाहीय. मी आणि सचिन आयुष्यभर याच क्षेत्रात काम करत राहणार आहोत. त्यामुळे कधीतरी एकत्र काम करण्याचा योग नक्कीच जुळून येईल. आम्ही दोघांनीही अनेक वर्षांत नाटक केलं नाहीय. त्यामुळे रंगभूमीवर दोघांना एकत्र काम करता यावं, अशी माझी खूप इच्छा आहे.
…तर सोनाली कुलकर्णी तिच्या सिनेमासाठी मानधन कमी करते, नुकताच केला खुलासा
मालिकाविश्व प्रयोगशील व्हायला हवं
हिंदी आणि मराठी या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकवर्ग निरनिराळा आहे. एकमेकांचं अनुकरण करत राहण्यापेक्षा प्रत्येक भाषेत प्रयोगशील मालिका सादर व्हायला हव्यात. आपल्या मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक प्रतिभासंपन्न लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. म्हणूनच वैविध्यपूर्ण विषय समर्थपणे मराठी मालिकांमध्ये हाताळले जातात.
घाईत सुचलेल्या ओळी…स्वानंद किरकिरेंनी शेअर केला ‘बावरा मन’ गाण्याचा खास किस्सा
रिअॅलिटी शोज – टॅलेंटची खाण
देशभरातील दुर्गम भागात दडलेलं टॅलेंट रिअॅलिटी शोजमुळे समोर येतं. आपल्याकडे प्रामुख्यानं संगीत आणि नृत्याचे रिअॅलिटी शोज होतात. यानिमित्त स्पर्धकांना एक हक्काचा मंच मिळवून दिला जातो. आजचे आघाडीचे अनेक गायक-संगीतकार, कोरिओग्राफर्स यांची सुरुवात रिअॅलिटी शोजपासून झाली होती. स्पर्धकांनी हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवून कलेची साधना करत राहणं महत्त्वाचं आहे.

संकलन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here