मुंबई: महाराष्ट्र ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे. सर्वच शहरांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ‘पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला. त्यामुळं आपण सर्वजण धन्यवादाला पात्र आहात’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हीच भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांना आपण सर्व जण साथ देऊ या, असंही आवाहन त्यांनी केलं.

जगावर करोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले.

इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सूचवलेलं आहे. त्यांना आपण सगळे जण साथ देऊ या आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here