हायलाइट्स:

  • मुंबईत मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक
  • आगामी निवडणुकांबाबत झाली चर्चा
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (राज ठाकरे) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. मनसे निवडणुकांसाठी सज्ज झाली असून, त्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापासून होत आहे. राज ठाकरे हे येत्या १४ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.

महाराष्ट्रात आगामी काळात महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. इतर पक्षांकडून जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच मनसेही प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. तशी तयारी आतापासूनच मनसेकडून सुरू आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या नवीन घरातच पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. राज ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात याच महिन्याच्या १४ तारखेपासून होत आहे.

साताऱ्यात वेगळंच राजकारण! राष्ट्रवादी देणार भाजपच्या राजेंना बँकेचं अध्यक्षपद?
Anandrao Adsul : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मोठा दणका, मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

१४ डिसेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. येत्या १४ डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची मुंबईतील बैठक झाली, अशी माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

कसा असेल महाराष्ट्र दौरा?

राज्यात येत्या काळात महापालिका निवडणुकांबरोबरच इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची आखणी केली आहे. राज्यातील सहा विभागांमध्ये हे दौरे होणार आहेत. राज ठाकरे हे सुरुवातीला मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १४ डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दिवशी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जातील. करोना नियमांचे पालन करतानाच, तिथे होणाऱ्या बैठकांमध्ये परवानगी मिळेल, तेवढ्याच कार्यकर्ते आणि नेत्यांची उपस्थिती असेल. राज ठाकरे या बैठकांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यानंतर राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहेत.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा शब्द चालला! जळगाव बँकेत पहिली संधी राष्ट्रवादीला
शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी २१ इच्छुक, पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here