हायलाइट्स:

  • दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये
  • राम चरणचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर
  • भूमिका निभावण्याची उत्सुकता

मुंबई: दाक्षिणात्य कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये सातत्यानं दिसत नसले, तरी बॉलिवूडमध्येही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेता राम चरण हे त्यापैकीच एक नाव. राम चरण लवकरच ‘आरआरआर’, ‘आरसी १५’ आणि ‘आचार्य’ या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या तिन्ही चित्रपटांतल्या त्याच्या भूमिकांविषयी उत्सुकता आहे.
अरे चाललंय काय! २३१ किमी चालून राम चरणला भेटायला पोहोचले तीन चाहते आणि…
दक्षिणेतले प्रसिद्ध अभिनेते चिरंजिवी यांचा मुलगा अशी ओळख घेऊन आलेल्या राम चरणनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला. राजामौली यांच्या ‘आरआरआर’मध्ये अजय देवगण आणि आलिया भट, ‘आचार्य’मध्ये वडील चिरंजिवी यांच्यासोबत, तर ‘आरसी १५’मध्ये कियारा अडवाणीसोबत तो काम करत आहे.


‘एस. एस. राजामौली हे भारतातले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडून सतत काही ना काही शिकायला मिळतं. शंकर यांच्यासोबत काम करणं हाही एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या चित्रपटांत झळकणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझ्या वडिलांबाबत काय सांगू, गेली ४० वर्षं या क्षेत्रात १५०हून अधिक चित्रपटांत ते झळकले. दिग्दर्शक शिवामुळे मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. भूमिकेची तयारी करून ते समोर येतात, तेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.’ २०२२-२३ हे वर्षं राम चरणचं असेल, अशी चर्चा आहे.
राजेशाही जगणं! हॉटेलमध्ये रहायचा कंटाळा म्हणून राम चरणने मुंबईत घेतला सी- फेसिंग बंगला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here