घरातील: भय्यूजी महाराज आत्महत्ये प्रकरणी धक्कादाय खुलासा ( भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण ) समोर आला आहे. भय्यूजी महाराज यांच्या घरी पलक पुराणिक ( पलक पुराणिक ) ही केअरटेकर म्हणून आली होती. पण तिची नजर भय्यूजी महाराजांच्या अमाप संपत्तीवर होती. तिने आधी महाराजांशी जवळीक साधली आणि नंतर त्यांना लग्नासाठी ब्लॅकमेल करायला सुरवात केली, असं माहिती समोर आली आहे.

भय्यूजी महाराजांनी १२ जून २०१८ ला स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे मानले जात होते. पण सात महिन्यांनंतर या प्रकरणात केअरटेकर पलक पुराणिक आणि दोन सेवादारांना अटक करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप चॅटिंगचे रेकॉर्ड समोर आले आहेत. यामुळे पलक पुरणिकचे सुटण्याचे मार्ग बंद होऊ शकतात.

भय्यूजी महाराज यांची पहिली पत्नी माधवी हिच्या मृत्यूनंतर पलक भय्यूजी महाराज यांच्याकडे केअरटेकर म्हणून आल होती. कालांतराने पलक त्यांच्या जवळ येऊ लागली. याच काळात भय्यूजी महाराज यांनी डॉ. आयुषीसोबत लग्न केले. पण ही गोष्ट पलक आणि तिच्या सहकाऱ्यांना खटकली. पलकने भय्यूजी महाराजांना उद्ध्वस्त करण्याचा इशारा देत जून २०१८ मध्ये लग्न करण्याचा अल्टिमेटम दिला होता.

भय्यूजी महाराजांच्या इंदूरमधील श्री सदगुरु धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टच्या देशातील अनेक राज्यांमध्ये शाखा आहेत. ट्रस्टकडे कोट्यवधींची नामांकित आणि बेनामी मालमत्ता आहे. भय्यूजी महाराज हे अनेक प्रकारच्या व्यवसायांशी निगडीत होते. पलकला याची पूर्ण जाणीव होती. यामुळे ती आधी भय्यूजी महाराजांच्या जवळ आली आणि त्यानंतर लग्नासाठी त्यांच्यावर दबाव आणू लागली.

भय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल केले जात होते आणि ड्रग ओव्हरडोज दिले जात होते, असे जानेवारी २०१९ मध्ये पोलिसांनी उघड केले होते. भय्यूजी महाराज आणि पलक यांच्यातील सोशल मीडियावरचे आक्षेपार्ह चॅटिंगचे पुरावेही पोलिसांना सापडले होते. गप्पा आणि इतर वैयक्तिक गोष्टींच्या आधारे पलक त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, असे पोलिसांनी सांगितले होते.

पलक पुराणिकचा भय्यूजी महाराजांच्या शेकडो कोटींच्या मालमत्तेवर डोळा होता. तिला रातोरात शेकडो कोटींची मालकिन व्हायचे होते. त्यामुळे ती भय्यूजी महाराजांची पत्नी होण्याचे स्वप्न पाहू लागली. त्यामुळे तिने भय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरू केला. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची दुसरी पत्नी आणि मुलगी यांच्यातील मालमत्तेच्या वादाला जोरात प्रसिद्धी दिली गेली.

Ayodhya Bomb Threat: अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीने खळबळ; ‘या’ राज्यातून कॉल

भय्यूजी महाराजांना हरदाला बोलावण्याची योजना होती, असे पलकच्या एका दुसऱ्या चॅटिंग रेकॉर्डवरून असे दिसून आले. पण भय्यूजी हरदाला गेले नाहीत. त्यांची दुसरी पत्नी डॉ. आयुषीवर जादूटोना करून त्यासाठी २५ लाख रुपये देण्याचीही चर्चा आहे.

farmer leader arrested : ‘त्या’ फार्म हाऊसवर सापडलं एक कोटीचं ड्रग्ज; शेतकरी नेत्याला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here