हायलाइट्स:

  • ओमिक्रॉनची कल्याण-डोंबिवलीत धडकी
  • नागरिकांसह पालिका प्रशासनही झाले सतर्क
  • लसीकरण केंद्रांकडे नागरिकांची पावले वळली
  • सात दिवसांत ७७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला डोस

डोंबिवली: भारतात ओमिक्रॉनचे आतापर्यंत दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणा, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डोंबिवलीत परदेशातून आलेला तरूण करोनाबाधित आढळल्यानंतर या परिसरात चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलंय. ओमिक्रॉनच्या भीतीने नागरिकांची पावलं आता पुन्हा लसीकरण केंद्रांकडे वळू लागली आहेत.

ओमिक्रॉनच्या (ओमिक्रॉन) भीतीने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची पावले पुन्हा केंद्रांकडे वळू लागली आहेत. २५ नोंहेबर ते २ डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत लसीचे डोस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. या सात दिवसांत तब्बल ७७ हजार ५६६ नागरिकांनी करोना लसीचे डोस घेतले आहेत.

Omicron : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रात २८ ओमिक्रॉन संशयित रूग्ण; १० जण एकट्या मुंबईत

Omicron variant : डोंबिवलीत आलेल्या ‘त्या’ करोनाबाधित तरूणाच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट आले

दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, हॉंगकॉंग यांसारख्या काही देशात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. केपटाऊन येथून डोंबिवलीत आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणालाही करोना संसर्ग झालाय. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

विदेशातून आलेल्या तरुणाला करोनाचा संसर्ग झाला. यानंतर मात्र, डोंबिवली आणि कल्याणमधील नागरिक सतर्क झाले आहेत. आपापल्या परीने खबरदारी घेत आहेत. रुग्ण आढळून येत असल्याने ही तिसऱ्या लाटेची धोक्याची घंटा तर नाही ना? याशिवाय अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रात लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ८७ टक्के लसीकरण झाले आहे. तरी २५ नोंहेबर ते २ डिसेंबर दरम्यान नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. या सात दिवसांत तब्बल ७७ हजार ५६६ नागरिकांनी करोनाची लसीचे डोस घेतले आहेत. यात पहिला डोस घेणारे १८ हजार ३९३ नागरिक आहेत. तर दुसरा डोस घेणारे ५९ हजार १७३ नागरिक आहेत.

अंबरनाथमध्ये रशियाहून परतलेली मुलगी पॉझिटिव्ह

जगभरात करोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने चिंता वाढवली आहे. त्यात डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला तरूण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच, आता अंबरनाथमध्ये रशियाहून कुटुंबीयांसह परतलेली ७ वर्षीय मुलगी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मुलगी आईवडिलांसह रशियात फिरण्यासाठी गेली होती. २८ नोव्हेंबरला हे कुटुंब राशियाहून अंबरनाथला परतले होते. त्यानंतर काही दिवसांत मुलीला त्रास होऊ लागल्याने करोना चाचणी केली असता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर मुलीच्या आईचा करोना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. या मुलीचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या हे कुटुंब क्वारंटाइन आहे. ते राहत असलेली इमारत सील करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Omicron Update : डोंबिवलीच्या ‘त्या’ तरूणासोबत विमान प्रवास करणाऱ्याचा करोना रिपोर्ट आला
omicron suspects in mumbai: धक्कादायक बातमी; मुंंबईत गेल्या २४ तासांत आढळले ओमिक्रॉनचे ५ संशयित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here