हायलाइट्स:
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
- अध्यक्षांच्या अनुपस्थितीवरून नाराजी
- साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मांडल्या भावना
‘संमेलन अध्यक्ष निवडीसाठी ३ वर्षांपूर्वी घटना बदलली, मात्र डॉ. जयंत नारळीकर आले असते तर बरं झालं असतं,’ असं मत कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात ते बोलत होते.
‘उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचं दुखणं असतानाही फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते. आपल्यासाठी अनेक लोक येणार हे जाणून फादर दिब्रेटो आले. मला जयंत नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र, त्यांची सर्व तयारी करण्याचं ठरवूनही ते आले नाही,’ अशा शब्दांत कौतिकराव ठाले पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला वेगळी किनार लागली. आता पुन्हा घटना बदलावी ही आमची इच्छा असल्याचंही ठाले पाटील म्हणाले.
विविध वेशभूषा साकारून शाळकरी विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग
‘जात प्रश्नावरून संमेलनावर टीका झाल्याचा खेद’
‘आजचा समाज काही बाबतीत सोयीनं वागतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेलिब्रिटी मौन पाळतात. राजकारणी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्दयपणे वागतात. म्हणून या प्रश्नावर परिसंवाद घेतला आहे. आजकालचे ग्रंथ उद्बोधक असतात असं नाही. जात पात आमच्या मनात येत नाही. आमची एकच भाषा म्हणजे साहित्य आहे. नाशिक साहित्य संमेलनात हा प्रश्न उपस्थित झाला याचा मला खेद वाटत आहे. जात पात विषयावर साहित्य संमेलन जितकं वेठीस धरल गेलं तितकं कुठलंच संमेलन वेठीला धरलं गेलं नाही,’ असंही ठाले पाटील म्हणाले.