मुंबई: करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं घोषित केलेली जमावबंदी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. प्रत्येक शहरात पोलीस गस्त घालत असून सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं, यासाठी काळजी घेत आहेत. जाणून घेऊ याबाबतच्या व अन्य ताज्या घडामोडी…

ताज्या घडामोडी:

>> पाचपेक्षा अधिक व्यक्तींना वाहनातून जाता येणार नाही, महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची माहिती

>> मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे एसटी आणि खासगी बसेससाठी बंद, फक्त हलकी वाहने सुरू

>> नवी मुंबई: मागणी नसल्याने भाजीपाल्याच्या किंमतींवर परिणाम नाही… भाजीपाला असोसिएशनचे मत

>> नवी मुंबईचा घाऊक भाजीपाला बाजार बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बंद. उद्या अखेरचे व्यवहार होणार

>> रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता. रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

>> २७ मार्चपासून राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात लॅब सुरू करणार – टोपे

>> राज्यात सहा नवी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत – टोपे

>> मधुमेही, दमा, बीपीचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या… आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

वाचा:

>> मुंबईतील अँटॉप हिल परिसरात भाजी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

>> मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेला ‘करोना’ची लागण

वाचा:

>> घरात राहून स्वत:ला, कुटुंबाला वाचवा; सरकारचे निर्णय गांभीर्याने घ्या… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन

>> जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

वाचा:

>> पुणे: शहरातील गुन्हेगारीत घट; जनता कर्फ्यूच्या दिवशी किरकोळ स्वरूपाचे चार गुन्हे दाखल

>> करोनाची भीती बाजारातही; डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

>> मुंबई करोनाचा तिसरा बळी, नवी मुंबईत राहणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

>> रविवार संध्याकाळपासून आणखी १५ रुग्ण सापडले; महाराष्ट्रातील आकडा ८९ वर

>> महाराष्ट्रात जमावबंदी आदेश लागू; पोलीस रस्त्यावर

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here