हायलाइट्स:

  • घशात च्युइंगम (Chewing Gum) अडकल्याने झाला घात
  • शाळकरी मुलाचा गुदमरून मृत्यू
  • गावावर पसरली शोककळा

जळगाव : शाळकरी मुलाच्या घशात च्युइंगम (चघळण्याची गोळी) अडकल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी समोर आली आहे. जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या पांढरट गावात ही घटना घडली असून उमेश गणपत पाटील असं मृत मुलाचं नाव आहे.

पांढरट गावात राहणारा उमेश पाटील हा शाळकरी मुलगा भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी उमेशची गणित विषयाची परीक्षा होती. परीक्षा संपल्यानंतर पांढरट ते भडगाव रिक्षाने जात असताना च्युइंगम खाण्याची सवय असलेल्या उमेशने नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या समवेत च्युइंगम खात रिक्षाने प्रवास सुरू केला होता.

Omicron Scare धक्कादायक: द. आफ्रिकेतून येताच करोनाने बेजार; कुटुंबातील तब्बल ९ जण बाधित

यावेळी च्युंइगम उमेश याच्या घशात अडकलं. जीव गुदमरू लागल्याने त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश मिळालं नाही. च्युइंगम थेट श्वसनलिकेत अडकल्याने उमेशला श्वास घेणे कठीण झाल्याने त्याला तातडीने भडगाव येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

राज्याला ओमिक्रॉनची चिंता; मात्र, करोनाच्या दैनंदिन आकडेवारीने दिला ‘हा’ दिलासा

श्वास गुदमरल्याने उमेश याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. शाळकरी मुलाचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here