औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण व शहरी मोजणी नकाशे, जुना सातबारा, गाव नकाशा ऑनलाइन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्व दस्तवेजाचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. सर्व्हर उपलब्ध होताच, या प्रक्रियेला वेग येईल, असा दावा जमाबंदी आयुक्त एन. सुधांशू यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमाबंदी आयुक्तांच्या उपस्थितीत ऑनलाइन प्रक्रिया आणि ड्रोन पाहणीच्या अनुषंगाने बैठक झाली. पुनर्वसन आयुक्त संजीव जायस्वाल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने, अधीक्षक दुष्यंत कोळी यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूमी अभिलेख कार्यालय अधीक्षक उपस्थित होते.

मराठवाड्यासाठी महत्तावाची बातमी, आता सर्व कागदपत्रे ऑनलाइन मिळणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बैठकीत डिजिटायझेशन, स्कॅनिंग, सॉफ्टवेअरचा वापर मराठवाड्यात कसा होतो आहे. तसेच नागरिकांना ऑनलाइन सर्व दस्त उपलब्ध होण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हानिहाय घेण्यात आला.

यात तहसिल व भूमी अभिलेखचे सर्वदस्त स्कॅन व अपलोड झाले असून सर्व्हर बसून ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर मोजणी नकाशे, जुना सातबारा, जुना गाव नकाशा ऑनलाइन मिळू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच एन-ए ची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here