त्यानंतर ऑर्डर मिळताच कंपन्यांनी लगेचच व्यायाम शाळेचे साहित्य जिल्हा क्रिडा अधिका-यांना पाठवले. पण पुण्यातील शालेय खेळ क्रिडा बचाव समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले यांनी याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा क्रिडा अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
तर याप्रकरणी क्रिडा व युवक कल्याण मंत्री केदार यांच्या आदेशाने उपसंचालक उर्मिला मोराळे, पुण्याच्या शिवछत्रपती क्रिडापीठाचे उपसंचालक सुहास पाटील आणि अनिल चोरमले हे जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे यांची प्रकरणासंदर्भात तीन दिवस चौकशी करणार आहे.
औरंगाबाद येथील क्रीडा विभागाअंतर्गत व्यायाम शाळा साहित्य खरेदी करण्याबाबत घोटाळा झाला असून, त्यात अनियमितता असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मी क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता चौकशी सुरू झाली असल्याचं कळतंय, असं तक्रादार शाम राजाराम भोसले यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले.