म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या RT-PCR चाचणीमध्ये एस, एन, ई हे जनुकीय घटक असतात. या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आरटी-पीसीआर चाचणीमध्ये एस हा जनुकीय घटक नसतो. त्यामुळे हा जनुकीय घटक आरटी-पीसीआर चाचणीमध्ये न आढळल्यास या रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असते. त्याची निदाननिश्चिती करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक असते.

ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे का याची निदाननिश्चिती करण्यासाठी एस हा जनुकीय घटक बी १.१.५२९ मधून नाहिसा झाल्याचे दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य संघटनांनी स्पष्ट केले आहे. ज्या रुग्णांना हा संसर्ग झाला आहे त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, सौम्य स्वरूपाचा ताप ही लक्षणे दिसून येत आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगच्या मदतीने निदानाची अचूकता अधिक स्पष्ट होते. डेल्टा विषाणूच्या संसर्गाची जागा ओमायक्रॉनने घेतली असून करोना संसर्गाची काही रुग्णांमध्ये असलेली दाहकता कमी होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ओमिक्रॉनची धास्ती घेतलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा! महापालिकेनं दिली ‘ही’ माहिती
Omicron : ‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी मुंबईत अशी केलीय ‘जम्बो’ तयारी

सध्या या चाचण्या ज्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येतात तिथे एकावेळी साडेतीनशे चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले. या विषाणूच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक आहे. त्यामुळे इतक्या मर्यादित स्वरूपात चाचण्या केल्यानंतर त्याचे निदान होण्यासाठी पुढे तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या प्रयोगशाळांची उपलब्धता वाढवण्याची निकडही व्यक्त होत आहे.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून सामान्यांनी यासंदर्भात भीती न बाळगता करोनाला प्रतिबंध करणारे वैयक्तिक व सार्वजनिक वर्तन ठेवावे, लसीकरण पूर्ण करावे. मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी यासंदर्भात स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Omicron Update : डोंबिवलीच्या ‘त्या’ तरूणासोबत विमान प्रवास करणाऱ्याचा करोना रिपोर्ट आला
Omicron Variant : डोंबिवलीत आलेल्या ‘त्या’ सहा प्रवाशांचे रिपोर्ट आले

राज्यातील तीस नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी

राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू असून विमानतळ आणि क्षेत्रीय अशा दोन्ही सर्वेक्षणातून आत्तापर्यंत एकूण तीस नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १४ नमुने एनआयव्ही, पुणे येथे, तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी या विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांतून आलेल्या २,८२१ प्रवाशांची शुक्रवारी सकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोन नमुने करोनाबाधित आढळले, तर इतर देशांमधून आलेल्या ११,०६० प्रवाशांपैकी २२४ प्रवाशांची तपासणी केली असता त्यापैकी एक प्रवासी करोनाबाधित आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

मुंबईतून ११ नमुने

मुंबईतून आत्तापर्यंत एकूण अकरा नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. २५ ऑक्टोबर रोजी पॅरिस येथून प्रवास करून आलेल्या सोळा वर्षीय मुलीचे, तर स्पेन येथून २८ ऑक्टोबर रोजी आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. गुरुवारी लंडन, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल, जर्मनी येथून आलेल्या नऊ प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

ओमिक्रॉनची कल्याण-डोंबिवलीत भीती; मागील ७ दिवसांत दिसून आला मोठा बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here