औरंगाबाद : आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये भाजपची मराठवाडा विभागीय आढावा बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील जीम खाना येथे मराठवाडास्तरीय विभागीय आढावा बैठक सुरू झालीय.
या आढावा बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हावार प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर चर्चा केली जात आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत काय चित्र असेल, त्यासाठी काय करावं लागेल यावर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असेल हे सुद्धा ठरवले जाणार आहे.