हायलाइट्स:

  • कल्याण-डोंबिवलीत परदेशांतून आले ७६ प्रवासी
  • महापालिकेकडून विदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू
  • ओमिक्रॉनने वाढवली कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता

कल्याण : ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी प्रत्येक महापालिकांना धाडली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत रशिया, शारजा, ओमान, सिंगापूर, मस्कत, युएई, सौदी अरेबिया, श्रीलंका, मास्को, दक्षिण कोरिया, स्वीडन, शिकागो या देशांतून ७६ नागरिक आले आहेत.

ओमिक्रॉनची कल्याण-डोंबिवलीत भीती; मागील ७ दिवसांत दिसून आला मोठा बदल
corona positive: अंबरनाथमधून चिंता वाढवणारी बातमी; परदेशातून आलेल्या ‘त्या’ मुलीचा करोना रिपोर्ट आला

नियमानुसार परदेशातून आल्यानंतर या नागरिकांनी किमान सात दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असतानादेखील हे नागरिक शिर्डी, पुणे, औरंगाबाद यांसह राज्याच्या विविध भागांत फिरत असून या नागरिकांना विलगीकरणाच्या नियमाचा विसर पडल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मागील गेल्या आठ दिवसांत येथे आलेल्या प्रवाशांचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू केला असता हे प्रवासी राज्याच्या विविध भागांत कामानिमित्त किंवा सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरत असल्याचे आढळून आले आहे.

या नागरिकांशी संपर्क करत ते असतील त्या महापालिकेच्या हद्दीत त्यांना करोना चाचणी करून त्याचा अहवाल महापलिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

Omicron Update : डोंबिवलीच्या ‘त्या’ तरूणासोबत विमान प्रवास करणाऱ्याचा करोना रिपोर्ट आला
Omicron Variant: ओमिक्रॉनवर मात कशी केली?; ‘त्या’ डॉक्टरनेच सांगितला १२ दिवसांचा घटनाक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here