हायलाइट्स:

  • ओमिक्रॉनला मुंबईत रोखणार
  • मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान
  • मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नाही
  • विदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी पंचसूत्री कार्यक्रम

मुंबई : करोनाचाय ओमिक्रॉन (Omicron) या नवीन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (बीएमसी) कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हाय रिस्क’ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अॅक्शन प्लान तयार केला आहे. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी पंचसूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या पंचसूत्री कार्यक्रमानुसार, मुंबई विमानतळाच्या सीईओंकडून हाय रिस्क देशांतून येणाऱ्या प्रवाशांची जी यादी आपत्कालीन कक्षाकडे पाठवण्यात येत आहे, त्यात सुसुत्रता यावी यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात यावा. त्यामुळे ही यादी आपत्कालीन विभागाकडून तातडीने मुंबई महापालिकेच्या २४ वार्डांमधील वॉर रूमकडे पाठवणे अधिक सोपे होईल. वॉर रुमशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या सलग सात दिवस प्रवाशांच्या संपर्कात राहू शकतील.

मोठी बातमी: भारतात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला; धोका वाढला

ओ-माय-क्रॉन… नवा व्हेरिएंट येताच डोंबिवलीकरांची लसीकरणासाठी गर्दी

मुंबई महापालिकेचा पंचसूत्री कार्यक्रम कसा असेल?

महापालिकेच्या वॉर्डांमध्ये विदेशांतून आलेल्या प्रवाशांची यादी पोहोचेल. त्यामुळे हे प्रवासी क्वारंटाइनचे नियम पाळतात की नाही, यावर महापालिका प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येईल. वॉर रूमकडून सर्व वॉर्डांमध्ये १० अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येतील. महापालिकेची वेगवेगळी पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके प्रवाशांच्या घरी जातील. नियमांचे पालन करण्यासंबंधी विचारणा आणि चौकशी करतील. प्रवाशांशी संबंधित सोसायट्यांनाही पत्र पाठवण्यात येईल. हे प्रवासी करोना नियमांचे पालन करतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात येतील.

ओमिक्रॉनची कल्याण-डोंबिवलीत भीती; मागील ७ दिवसांत दिसून आला मोठा बदल

मुंबईत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही

किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, जर एखाद्या सोसायटीत परदेशातून कुणी आला असेल, तर त्यावर लक्ष ठेवावे. संबंधित व्यक्तीकडून करोना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे पाहावे. संबंधित व्यक्तीची माहिती तातडीने पालिकेला द्यावी. दरम्यान, मुंबईत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. एखाद्याला संसर्ग झाला तर, धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

Omicron : कल्याण-डोंबिवलीत परदेशांतून आलेल्या ‘त्या’ ७६ जणांचा शोध सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here