हायलाइट्स:
- परदेशातून रत्नागिरीत आले ७४ प्रवासी
- रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू
- जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिल्या खबरदारीच्या सूचना
- लांजा आणि गुहागरमध्ये एकही परदेशी नागरिक आलेला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जवळपास २६ जण हे एकट्या रत्नागिरी तालुक्यात आले आहेत. तर जिल्ह्यात एकूण ७४ प्रवासी परदेशातून परतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद ठेवून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ७४ नागरिक परदेशातून आले आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कशी घेतली जातेय काळजी?
परदेशातून आलेल्या नागरिकांनी आठ दिवस घराबाहेर पडू नये, लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात ७४ नागरिक आतापर्यंत आलेले असून, सरकारकडून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात परदेशांतून आलेल्यांपैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जात म्हणजे २६ नागरिक आलेले आहेत. मंडणगडमध्ये २, चिपळूण १० ,दापोली १२, खेड १९, संगमेश्वर ४ ,राजापूर १ प्रवासी आला आहे. लांजा आणि गुहागरमध्ये एकही परदेशी नागरिक आलेला नाही. या आलेल्या नागरिकांनी आठ दिवस आपल्या घरातच राहायचे आहे. काही लक्षणे आढळल्यास संबंधित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. या लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी आठव्या दिवशी चाचणी करून घ्यायची असून, घराबरोबरच गावातील लोकांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times