हायलाइट्स:

  • हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्धवस्त
  • ३ वर्षीय मुलाचा मृत्यू
  • दुसऱ्याची प्रकृती गंभीर

जळगाव : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. आर्यन नसीब तडवी (वय ३ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे, तर त्याचा भाऊ रिहान (वय ५ वर्ष) हा जखमी असून त्याला उपचारार्थ बुलडाणा येथे हलवण्यात आलं आहे. (जळगाव अपघात ताजे अपडेट)

या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी खासगी वाहनांची तोडफोड केली. पहुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपतींनी बदलला मार्ग; संभाजीराजेंनी केला ‘सॅल्युट’!

नेमकं काय घडलं?

धामणगाव बढे बसस्थानकावरुन शनिवारी बालाजी ट्रॅव्हल्स ही खाजगी बस (क्र. एम.एच- २१ -बी.एच.- ०६४७) प्रवाशांना घेऊन जामनेरकडे निघाली होती. मात्र वाटेत देऊळगाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रिहान तडवी आणि आर्यन तडवी या दोन भावंडांना बसने धडक दिली. यात चाकाखाली आल्याने दोन्ही भावंडे जखमी झाली आहेत. दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेते असताना आर्यनचा वाटेतच मृत्यू झाला. रिहान याची तब्येत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Thane crime : दारूच्या पैशांवरून वाद; पुढे त्या तरूणासोबत असं काही घडलं की…

अपघातानंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अरुण धनवटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथूनही अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, लहान मुलांना धडक देणार्‍या बसचा चालक आणि क्लिनर यांना जमावाच्या तावडीतून पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here