हायलाइट्स:

  • लोणी काळभोर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसाला अटक
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
  • ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच

पुणे : ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच घेताना लोणी काळभोर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास भास्कर हजारे (वय ३५) असं अटक केलेल्या पोलिसाचं नाव आहे. (पुण्यातील लाच प्रकरण)

याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीवर आहेत. स्वारगेट ते सोलापूर अशा त्यांच्या ट्रॅव्हल्स बस प्रवासी वाहतूक करतात. तक्रारदार यांच्या ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) जाऊन याबाबत तक्रार दिली.

Omicron Variant : पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये आढळला करोनाचा ‘हा’ व्हेरिएंट!

एसीबीने तक्रारीनुसार पडताळणी केली. त्यावेळी सुहास हजारे याने तक्रारदार यांच्याकडे ६ हजार रूपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झाले. हजारे याला लोणी काळभोर येथील टोलनाका परिसरात तडजोडअंती ५ हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी अलका सरग या अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here