पुणे : करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या घातक व्हेरिएंटबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील कर्नाटक आणि गुजरात या राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळला आहे. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने आता प्रशासनाकडूनही अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. अशातच झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला आहे. (पुणे कोरोनाव्हायरस ताज्या बातम्या)

झांबिया देशातून पुण्यात आलेल्या ६० वर्षीय रुग्णामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट आढळलेला नाही, तर या रुग्णामध्ये डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे. शनिवारी सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांचीही आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.

Omicron Variant Update: ओमिक्रॉनचे देशात चार रुग्ण; ‘त्या’ ५५ जणांच्या अहवालाबाबत धाकधूक

मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोव्हिड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.

Omicron Variant : महाराष्ट्राचा धोका वाढला; ‘या’ शहरात आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

शासनाने नागरिकांना काय आवाहन केलं?

‘विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोव्हिड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपलं लसीकरण पूर्ण करावं आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी,’ असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here