हायलाइट्स:
- जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्या घरी गुंजणार सनईचे सूर
- ‘तारक मेहता’ मधील सर्व कलाकार लग्नसोहळ्याला राहणार उपस्थित
- मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणार शानदार विवाहसोहळा
जेठालाल यांच्या घरी गुंजणार सनईचे सूर
दिलीप जोशी यांच्या घरात सध्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. दिलीप जोशी यांच्या मुलीचे लग्न असल्याने सध्या ते त्यामध्ये व्यग्र आहेत. दिलीप जोशी यांना ऋत्विक आणि नियती अशी दोन मुली आहेत. यातील नियतीचे लग्न येत्या ११ डिसेंबर रोजी आहे. या लग्नसोहळ्याला मालिकेतील सर्व कलाकारांना जोशी यांनी आमंत्रित केले आहेत. नियतीचा विवाहसोहळा मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणार आहे. दिलीप जोशी यांचा होणारा जावई एनआरआय असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लग्नसोहळ्याला दयाबेनची अनुपस्थिती
दिलीप जोशी यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्याला तारक मेहतामधील सर्वकलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये दयाबेन अर्थात दिशा वकानी या लग्नसमारंभाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वास्तविक दिशा वकानी आणि दिलीप जोशी यांच्यात चांगले बॉडिंग आहे. या लग्नसोहळ्याला दिशा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.