हायलाइट्स:

  • श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या शिरला
  • लहान मुलांसह पाच जणांवर हल्ला
  • हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यंत्रणेला यश

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला आहे. अशातच आज श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांसह पाच जणांवर या बिबट्याने हल्ला केला. शहरातील मोरगेवस्ती येथे रविवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (बिबट्याचा हल्ला अहमदनगर न्यूज अपडेट)

या बिबट्याने सुरुवातीला मोरगे येथे एका स्थानिकाच्या घरात शिरून एक महिला आणि दोन पुरुषांना जखमी केले. कांता कुमावत, राहुल छल्लारे, बाळासाहेब अडांगळे अशी जखमींची नावे आहेत. त्यानंतर या बिबट्याने परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांवर देखील हल्ला केला. यात श्रद्धा हिंगे आणि वृषभ निकाळजे हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ओमिक्रॉनला वेळेत थांबवू शकलो नाही तर…; आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ धोक्याची सूचना

घटनेची माहिती मिळताच आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक तसंच अनेक लोक प्रतिनिधींसह पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

test for omicron: खळबळजनक! विदेशातून आलेले ‘ते’ सहाजण करोनाग्रस्त; त्यांच्यासोबत होते ४२ जण

धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजर्‍यात

शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी आणि श्रीरामपूर पोलिसांनी एकत्र येत पकडलं आहे. मोहटादेवी मंदिर परिसरातील एका घराच्या बाहेर बोळीत बिबट्या लपला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्याने बिबट्याला इंजेक्शनद्वारे बेशुध्द केलं आणि त्यानंतर पिंजऱ्यात टाकण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here