हायलाइट्स:

  • साहित्य संमेलनात करोनाचा शिरकाव
  • पुण्याहून आलेले दोन प्रकाशक करोनाबाधित
  • संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेची धावपळ

नाशिक : ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यातही खबरदारी बाळगण्यात येत असून निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. अशातच भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. (नाशिक कोरोना अपडेट्स)

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक करोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.

ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला; प्रेमविवाह केल्यानं बहिणीची अमानुष हत्या

करोनाबाधित आढळलेल्या दोन प्रकाशकांना त्यांची तयारी असल्यास बिटको रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जाणार आहे किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे. याबाबत नाशिक पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, करोनाबाधित एक जण पिंपरीचा तर दुसरा आळंदी येथील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here