हायलाइट्स:

  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दादर येथे चैत्यभूमीवर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वानखेडेंनी केले अभिवादन
  • समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (समीर वानखेडे) यांनी आज, सोमवारी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर उपस्थिती लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते चैत्यभूमीवर आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केले. महामानवाला अभिवादन केल्यानंतर समीर वानखेडे हे बाहेर जात असताना, त्यांच्या विरोधात काही जणांनी घोषणाबाजी केली. तर त्यांच्या समर्थकांनीही घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी आले आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. मात्र, यंदाही करोनामुळं गर्दी न करता, डॉ. बाबासाहेबांना ऑनलाइन पद्धतीने अभिवादन करा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अनुयायी चैत्यभूमीवर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड किल्ल्यावर येणार; कडेकोट पहारा, १ हजारांहून अधिक पोलीस तैनात

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीही चैत्यभूमीवर हजेरी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले. मात्र, तेथून बाहेर पडताना वानखेडेंच्या विरोधकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर त्यांच्या समर्थकांनीही वानखेडेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असून, अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असे म्हणणे चुकीचे आहे. आम्हीही दरवर्षी या ठिकाणी येतो. काही लोकांनी येथे येणे सुरू केले आहे, ही चांगली बाब आहे, असेही ते वानखेडेंचे थेट नाव न घेता म्हणाले.

मराठवाड्यात करोनाचा धोका वाढला, ४१ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू
‘मी नगरला पोलीस आहे, तपासासाठी जळगावात आलोय’ असं सांगून त्यानं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here