हायलाइट्स:

  • राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला, प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
  • करोना लसीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का?: अजित पवार
  • बुस्टर डोस देण्यासंदर्भात देश पातळीवर निर्णय घेण्याची गरज

मुंबई: कोविड -१९ च्या ओमिक्रॉन (Omicron प्रकार ) या नव्या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकार खबरदारी घेत आहे. ‘ओमिक्रॉनला रोखण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे किंवा नाही याबाबत राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे,’ असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन कोणती पावले उचलत आहे, त्याबद्दल माहिती दिली. या आजाराला आळा घालण्यासाठी लसीचा बुस्टर डोस आवश्यक आहे की नाही, याबाबत देश पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

धारावीवर ‘नजर’!, टांझानियातून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह
coronavirus updates चिंतेत भर: ओमिक्रॉनचे संकट असताना करोनाचे दैनंदिन रुग्ण वाढले; मृत्यू मात्र घटले

राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री, प्रशासन आणि मंत्रिमंडळाचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या राज्यात बाहेरून लोक येत आहेत, त्याबद्दल केंद्राने कठोर भूमिका घ्यायला हवी, नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे की नाही, हे बघितले पाहिजे. देशात जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, तिथे काळजी घेतली पाहिजे. सध्याची परिस्थिती बघता, विविध राज्यांत एक-दोन रुग्ण आढळले होते. पण एका ठिकाणी तर, संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस दिला जावा किंवा नाही, याबाबत तातडीने निर्णय घ्यायला हवा, असे पवार यांनी सांगितले. काही ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. मग बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज आमच्याकडे डोस उपलब्ध आहेत. यासंदर्भात देश पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे असे मला वाटते, असेही ते म्हणाले. लसीचा बुस्टर डोस घ्यावा की नाही, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे तो देण्याची गरज आहे का, हे सांगितले पाहिजे. ज्या तज्ज्ञांनी यावर संशोधन केले आहे, ते याबद्दल सांगू शकतात, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात रविवारी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिवसभरात ६७७ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ७०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ८६ हजार ७८२ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या सहा कोटी ६० लाख ७८ हजार ६१६पैकी ६६ लाख ३८ हजार ७७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०५ टक्के आहे.

omicron threat in mumbai: मुंबईकरांची धाकधूक वाढली; पूर्व आफ्रिकेतून धारावीत आलेला ‘तो’ प्रवासीही…
मुंबई: समीर वानखेडे यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन, नवाब मलिक म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here