मुंबई: सध्या अनेक कारणांमुळे बरेचसे चित्रपट ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यमावर प्रदर्शित केले जात आहेत. , , आणि हे कलाकार असलेल्या शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी सिनेमाची बरीच चर्चा होती. या चर्चेत आता आणखी भर पडली आहे.

या सिनेमाला वित्तपुरवठादार मिळत नसल्यामुळे त्याच्या प्रदर्शनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. यामुळे हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार असल्याचं बोललं जातंय. सुत्रांनुसार दीपिका यात फिटनेस ट्रेनरच्या भूमिकेत दिसणार असून अनन्या पांडे तिच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा विवाहबाह्य संबंधांवर आधारित असल्यानं यात अनेक जवळीक दाखवणारी दृश्यं आहेत.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आल्यास सेन्सॉर बोर्ड यातील अनेक दृश्यांवर कात्री लावण्याची शक्यता आहे. चित्रपटातून ती दृश्यं हटवल्यास त्याचा चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. यामुळेच निर्मात्यांना हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावा लागणार असल्याचं बोललं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here