हायलाइट्स:

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • काही वर्षापासून संविधानातील मूलतत्वांना तिलांजली दिली जात आहे: पटोले
  • ‘बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचारच या देशासाठी हिताचा’

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाचा कारभार आतापर्यंत चालत आला आहे. मात्र मागील काही वर्षापासून संविधानातील मूलतत्वांना तिलांजली दिली जात असून, संविधानच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असेही ते म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यानिमित्त पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची व्यवस्था केली. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य समाज घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.” संविधानाने सर्व समाज घटकांना समान न्यायाचा मार्ग दाखवला. हजारो वर्षे अन्याय, अत्याचार सहन करावा लागणाऱ्या वंचित, मागास घटकाला बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, हा मंत्र देऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात नवी ओळख देण्याचे क्रांतीकारी कार्य केले आहे, असेही पटोले म्हणाले. बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचारच या देशासाठी हिताचा आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच वाटचाल करूयात आणि संविधान वाचवूया, असे आवाहन पटोले यांनी केले.

Shiv Sena: शिवसेना मोठा निर्णय घेण्याची शक्यता; राहुल-प्रियांकांना संजय राऊत भेटणार
शरद पवार उद्या दिल्लीत; राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार, ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा

टिळक भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनी प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विषय राजकारणाचा नाही अस्तित्वाचा आहे; पंकजा मुंडे यांच्या ट्वीटची चर्चा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा खजिना सामान्य वाचकांसाठी खुला, सर्व पुस्तकं एकाच ग्रंथालयात मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here