हायलाइट्स:

  • जिल्हा बँकांवरील राष्ट्रवादीचा दबदबा यावेळीही कायम
  • राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी वर्णी
  • नाईक यांच्या निवडीने २५ वर्षांनंतर शिराळा या डोंगरी तालुक्याला अध्यक्षपदाची संधी

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांवरील राष्ट्रवादीचा दबदबा यावेळीही कायम राहिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं अध्यक्षपद (जिल्हा बँकेचे अध्यक्ष) राष्ट्रवादीकडे राहिलं असून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या निवडीने २५ वर्षांनंतर शिराळा या डोंगरी तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली, तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या रूपाने जिल्हा बँकेत पहिल्यांदाच महिलांना उपाध्यक्ष पद मिळालं आहे.

India Lockdown Update: तिसऱ्या लाटेचा धोका; आता लॉकडाऊन टाळायचं असेल तर ‘हे’ करावंच लागेल!

मावळते अध्यक्ष दिलीप पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. दिलीप पाटील हे पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. गेल्या वेळी दिलीप पाटील हे अध्यक्ष असताना, संचालक मंडळात मानसिंगराव नाईक हे संचालक होते.

omicron in kalyan dombivli: कल्याण डोबिंवलीकरांची चिंता वाढली; ‘त्या’ १०९ जणांचा संपर्कच होत नाहीए

दरम्यान, मानसिंगराव नाईक यांनी त्यावेळी कारभाराबाबत आक्षेप घेऊन शासनस्तरावर तक्रारी केल्या होत्या. आता चांगला कारभार करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असं नूतन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here