औरंगाबाद : राज्यभरात चर्चेत आलेलं लसीकरणाबाबतचं औरंगाबाद पॅटर्न यशस्वी ठरला असून, नोव्हेंबर महिन्यात देशातील २६ व्या क्रमांकावर असलेला औरंगाबाद आता थेट १६ व्या क्रमांकावर आला आहे. तर लसीकरणात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद पॅटर्नची चर्चा पाहायला मिळत आहेत.

देशातील करोनाची परिस्थिती पाहता लसीकरण एकमेव पर्याय सध्या देशापुढे आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र, असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत लसीकरण मोहीमेचा वेग मंदावल्याने जिल्हा २६व्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीतून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘औरंगाबाद पॅटर्न’ अशी मोहीम राबवत लसीकरणाबाबत काही निर्णय घेतले.

‘ओबीसी आरक्षणाला स्थगिती, केंद्राचे घाणेरडे राजकारण’, कॉंग्रेस खासदाराची टिका
लसीकरण नसेल तर पेट्रोल,रेशन,किराणा आणि शासकीय सुविधा मिळणार नसल्याचे कठोर निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतले. त्यांनतर जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढला आणि रविवारपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के लोकांनी पहिला तर ३१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार लोकांना पहिला डोस देत प्रशासनाने ७८ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठले आहे.

‘औरंगाबाद पॅटर्न’ यशस्वी ठरला…

औरंगाबादच्या लसीकरणाचा वेग कमी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीसीद्वारे बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ काही कठोर निर्णय घेतले ज्यात लसीकरण नसलेल्या लोकांना पेट्रोल,रेशन,किराणा, दारू आणि शासकीय सुविधा मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी जिल्हाधिकारी यांनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन कारवाई सुद्धा केली. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत झाली. त्यानंतर अनेक जिल्ह्यांनी ‘औरंगाबाद पॅटर्न’ची कॉपी केली.

हृदयद्रावक! विहिरीत पडलेल्या चिमुकलीला वाचवताना आईचाही मृत्यूसॅप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here