जालना : तब्बल महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू असून संप काळात शेकडोने कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले तरी एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. परंतु, काही कर्मचारी कर्तव्य भावनेतून पुढे आले असल्याने लालपरी आता कुठे रस्त्यावर धावायला सुरुवात झाली. पण तरीही एसटी बसवर दगडफेकीचे संकट असल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण आहे.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद ते भोकरदन अशी एसटी बस काल सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरात आली. प्रवाशांना सोडून पुन्हा जाफराबादकडे जात असताना भोकरदन तालुक्यातील अन्वा पाटीच्या पुढे मळणीयंत्र शोरूम जवळील रोडवर विना क्रमांकाच्या हिरो होंडा गाडीवर तोंड बांधून आलेल्या अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. त्यात चालकाच्या कॅबिनची काच फुटल्याची घटना घडली आहे.

महापौरांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली, महिला आयोगाने मागवला अहवाल

सुदैवाने चालकासह प्रवाशांनाही इजा झाली नाही. एसटी बसचे चालक राजू पांडुरंग बोराडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफराबाद आगारातून संप काळात सोमवारी ६ रोजी सकाळी भोकरदनकडे निघालेली ही बस सुखरूप रवाना तर झाली पण भोकरदनहून पुन्हा जाफराबादकडे जात असतानाच अज्ञातांकडून या बसवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेनंतर तीच बस दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात पुन्हा जाफराबादकडे रवाना करण्यात आली आहे.

शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमच्या जागेसाठी निवडणूक, भाजपने ऐनवेळी बदलला उमेदवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here