यंदाही खरीप हंगाम आत बट्टयाचा ठरल्याने शेत कऱ्यांच्या ‘आशा’ रब्बी पिकावर असताना बेमोसमी अवकाळी पाऊस व सध्यस्थितीतील ‘जवाद’ चक्रीवादळामुळे वातावरण बदलल्याने पुन्हा धुके व थंडीने जागा घेतली आहे. या वातावरणाचा परीणाम रब्बी हंगामातील पेरलेला गहु, हरभरा, सुर्यफूल, कांदा, कांदा बीजोत्पादनावर होत असून यामुळे पिकांची वाढ खुंटली असून याचा परीणाम पुढील पिकाच्या उत्पन्नावर होणार आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी प्रतिकुल बाबींचा परीणाम उत्पन्नावर होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी, हवामान बदलाचा वेध घेऊन पिकांसाठी उपाय योजना कराव्यात, सर्व सामान्य शेतकऱ्यांनी खर्चिक पिकांच्या मागे न लागता, करडई, जवस, सोयाबीन या तेल वर्गिय पिकांकडे रब्बी हंगामासाठी वळावे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा फटका कांदा, गहु, हरभरा व मोठया प्रमाणावर आंबा या फळबाग पिकांना बसणार असून, शेतकऱ्यांनी काळजी घावी असा सल्ला कृषिभूषण आणि प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब थोरात यांनी दिला आहे.