हायलाइट्स:
- धरणगाव तालुक्यात धक्कादायक घटना
- अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने केला अत्याचार
- फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
पीडित अल्पवयीन मुलगी धरणगाव तालुक्यातील एका गावात आई, बहीण व भाऊ अशा कुटुंबासह राहते. सहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या वडिलांचं निधन झालं आहे. सोमवारी रात्री ८ वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. रात्री ९ वाजता पीडित मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्याच परिसरातील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी जागेवर नसल्याचं रात्री १० वाजता तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. मध्यरात्री १२.३० वाजता अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान, याप्रकरणी आज मंगळवारी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.