हायलाइट्स:

  • कापूस व्यापारी खून प्रकरण
  • पोलीस निरीक्षकांनी स्वतःच केला न्यायालयासमोर युक्तीवाद
  • अटकेतील सर्व संशयितांना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जळगाव : एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणी (जळगाव खून प्रकरण) अटकेतील सर्व सहा संशयितांना मंगळवारी धरणगाव न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील मास्टरमाईंड पोलीस कर्मचारी असून गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयात संशयितांच्या पोलीस कोठडीसाठी युक्तीवाद केल्याचं पाहायला मिळालं.

पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार अडवून चौघा दुचाकीस्वारांनी चाकुने हल्ला चढवला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ७२ तासातच गुन्हा उघडकीस आणला होता. यात हल्लेखोरांमध्ये प्रमुख संशयित पोलीस कर्मचारी असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानुसार पोलीस कर्मचारी नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव, कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), विक्रम राजू सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव) यांना अटक करण्यात आली होती.

Omicron Scare ओमिक्रॉनचा धोका: ‘या’ राज्याचे कठोर पाऊल, राजधानीत थेट जमावबंदी लागू!

सोमवारी संशयितांची ओळखपरेड करण्यात येऊन मंगळवारी त्यांना धरणगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमाल आहे! कल्याणच्या ३ लहान मुलांनी केला पराक्रम; लोकांनी घातली तोंडात बोटं

अटकेतील संशयितांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर प्रभावीपणे मुद्दे मांडून तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले. संशयितांच्या मोबाईल सीडीआरमधून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते, असं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं. त्यावर बचाव पक्षाने मोबाईल सीडीआर काढण्यासाठी पोलीस कोठडीची गरज काय? असं विचारलं. त्यावर तपासधिकारी पोलीस निरीक्षक शेळके यांनी सीडीआर आधीच काढलेला आहे. पण कोणत्या आरोपीला कुणाचा फोन आला किंवा त्याने कुणाला फोन लावला? याची माहिती स्वत: आरोपीच देऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

दरम्यान, ओळख परेडमध्ये चारच आरोपींना ओळखण्यात आल्यामुळे उर्वरित दोन संशयितांना पोलीस कोठडीची गरज नाही, असंही वकिलांकडून सांगण्यात आलं. यावरही तपास अधिकारी निरीक्षक शेळके यांनी सांगितलं की, ओळख परेडशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. त्याचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. तसंच मूळ फिर्यादीत चार संशयित होते. त्यानंतर इतर दोन संशयित कटात सहभागी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अगदी वाढीव कलमांची परवानगी न्यायालाकडून घेण्यात आली असल्याचा मुद्दाही शेळके यांनी मांडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here