औरंगाबाद : अचानक रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी घरी येऊन मुलाला उचलून नेल्याचं पाहून धडकी भरलेल्या बापाने जागेवरच जीव सोडल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पीपळवाडी येथी घडली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील पीपळवाडी येथील शेख शब्बीर ( वय ६३ ) हे आपल्या घरी असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक घरात पैठण एमआयडीसी पोलीस आले. तसेच तुमचा मुलगा कुठं आहे म्हणत, शोधाशोध करत त्यांच्या मुलगा बिलाल शेख याला घरातून उचलून नेलं. हे पाहून वडिल शब्बीर शेख यांना धक्का बसला आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जागीच जीव सोडला.

या घटनेनंतर परीसरात तणावाचे वातावरण असून, सध्या बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परिस्थिती पाहता घटनास्थळी तीन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल स्वतः घटनास्थळी लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here